आंधळेपणा फिटे जिवंत
आंधळेपणा फिटे जिवंत होतसे दिठी रे
उजेड तूच दाविलास या जिवास शेवटी रे
सूर्य-चंद्र-चांदण्या दूर दूर राहू दे
दिससी तू तसाच का? तेज मला पाहू दे
नकोच आज लोकलाज घालू दे तुला मिठी रे
देव-दैव याहुनी मजसी तूच थोर रे
उघडताच पापणी, तूच ये समोर रे
कवेत घेई बावरेस हसव धरून हनुवटी रे
पाहणे, न पाहणे, सारखेच यापुढे
वेड तेच या जगी तुझेच रूप आवडे
खरेच रत्नं-माणके तुझ्यापुढे न भावती रे
उजेड तूच दाविलास या जिवास शेवटी रे
सूर्य-चंद्र-चांदण्या दूर दूर राहू दे
दिससी तू तसाच का? तेज मला पाहू दे
नकोच आज लोकलाज घालू दे तुला मिठी रे
देव-दैव याहुनी मजसी तूच थोर रे
उघडताच पापणी, तूच ये समोर रे
कवेत घेई बावरेस हसव धरून हनुवटी रे
पाहणे, न पाहणे, सारखेच यापुढे
वेड तेच या जगी तुझेच रूप आवडे
खरेच रत्नं-माणके तुझ्यापुढे न भावती रे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | देवमाणूस |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
दिठी | - | दृष्टी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.