आम्रतरूशी लग्न व्हायचे
आम्रतरूशी लग्न व्हायचे आज मालतीचे
चला फुलांनो, वेचू आपण क्षण हे मांगल्याचे
दाही दिशांनी मंडप केला
दवबिंदूंनी सडा शिंपिला
पवन वाजवी धुंद मनाने स्वर ते सनईचे
हिरवा शालू नेसुन सुंदर
सृष्टी सजली आज मनोहर
मंगलाष्टके पक्षी गाती कंपित शब्दांचे
अंत:पट पानांचा सरला
शुभमंगल ही झाली वेळा
सारे बघती मीलन झाले प्रेमी हृदयांचे
चला फुलांनो, वेचू आपण क्षण हे मांगल्याचे
दाही दिशांनी मंडप केला
दवबिंदूंनी सडा शिंपिला
पवन वाजवी धुंद मनाने स्वर ते सनईचे
हिरवा शालू नेसुन सुंदर
सृष्टी सजली आज मनोहर
मंगलाष्टके पक्षी गाती कंपित शब्दांचे
अंत:पट पानांचा सरला
शुभमंगल ही झाली वेळा
सारे बघती मीलन झाले प्रेमी हृदयांचे
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | क्षण आला भाग्याचा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.