आह्मां नादीं विठ्ठलु
आह्मां नादीं विठ्ठलु आह्मां छंदी विठ्ठलु
हृत्पदीं विठ्ठलु मिळतसे ॥१॥
आह्मां धातु विठ्ठल मातु विठ्ठलु
गातु विठ्ठलु आनंदें ॥२॥
आह्मां राग विठ्ठलु रंग विठ्ठलु
संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥
आह्मां ताल विठ्ठलु मेळ विठ्ठलु
कल्लोळ विठ्ठलु कीर्तनें ॥४॥
आह्मां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु
वक्ता विठ्ठलु वदनीं ॥५॥
आह्मां मनीं विठ्ठलु ध्यानीं विठ्ठलु
एका जनार्दनीं अवघा विठ्ठलु ॥६॥
हृत्पदीं विठ्ठलु मिळतसे ॥१॥
आह्मां धातु विठ्ठल मातु विठ्ठलु
गातु विठ्ठलु आनंदें ॥२॥
आह्मां राग विठ्ठलु रंग विठ्ठलु
संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥
आह्मां ताल विठ्ठलु मेळ विठ्ठलु
कल्लोळ विठ्ठलु कीर्तनें ॥४॥
आह्मां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु
वक्ता विठ्ठलु वदनीं ॥५॥
आह्मां मनीं विठ्ठलु ध्यानीं विठ्ठलु
एका जनार्दनीं अवघा विठ्ठलु ॥६॥
गीत | - | संत एकनाथ |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
धातु | - | मूलभूत द्रव्य / शरीरातील सप्त धातूंची नावे- रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र. |
श्रुति | - | कान / ऐकणे / आवाज / धर्मग्रंथ / स्वरावयव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.