A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आह्मां घरीं धन

आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें ।
शब्दाचींच शस्त्रें यत्‍ने करूं ॥१॥

शब्दचि आमुच्या जिवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥

तुका ह्मणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करूं ॥३॥