आमचा राजू का रुसला
रुसु बाई रुसु कोपर्यात बसु
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यूं, ढिश्यूं, ढिश्यूं
हा हा ही ही हो हो
आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी
आमचा राजू का रुसला, आमचा राजू का रुसला?
सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला?
गाल गोबरे गोरेगोरे, लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्रमुखाचा उदास का दिसला?
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला?
बावन पत्ते बांधु वाडा, शर्यत खेळू घोडाघोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला?
चिमणी खाई मोती-दाणे, गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला?
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला?
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यूं, ढिश्यूं, ढिश्यूं
हा हा ही ही हो हो
आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी
आमचा राजू का रुसला, आमचा राजू का रुसला?
सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला?
गाल गोबरे गोरेगोरे, लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्रमुखाचा उदास का दिसला?
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला?
बावन पत्ते बांधु वाडा, शर्यत खेळू घोडाघोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला?
चिमणी खाई मोती-दाणे, गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला?
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला?
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी |
चित्रपट | - | अनोळखी |
गीत प्रकार | - | बालगीत, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.