A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आल्या नाचत नाचत

आल्या नाचत नाचत मेनका-रंभा
आज अवतरली जशी इंद्रसभा

कानांत पाचुची कर्णफुले
कंठात हिर्‍यांची माळ रूळे
नवरत्‍न कटिवर चमचमले
जशी रवि-चंद्राची तेज:प्रभा

स्वर किन्‍नर गाती सप्तसूरा
दशदिशा उजळती रंग झरा
देहभान हरपले चराचरा
रसपान करीत नटराज उभा