आली सखी आली प्रियामीलना
आली सखी आली, प्रियामीलना !
काय पाहती व्याकुळ लोचन?
कानोसा घे मध्येच थबकुन
आतुर अंतरी, कंपित अधरी
थरथरते कामना
आली सखी आली, प्रियामीलना !
काजळकुंकुम रेखुन ल्याली
साडी जांभळी, हिरवी चोळी
घेई तनुवरी शेला भर्जरी
लपवी यौवनखुणा
आली सखी आली, प्रियामीलना !
बकुळफुलांनी गुंफिली वेणी
कर्णभूषणे झुलती कानी
रुणुझुणु गाती कंकण हाती
गुपित सांगती जना
आली सखी आली, प्रियामीलना !
काय पाहती व्याकुळ लोचन?
कानोसा घे मध्येच थबकुन
आतुर अंतरी, कंपित अधरी
थरथरते कामना
आली सखी आली, प्रियामीलना !
काजळकुंकुम रेखुन ल्याली
साडी जांभळी, हिरवी चोळी
घेई तनुवरी शेला भर्जरी
लपवी यौवनखुणा
आली सखी आली, प्रियामीलना !
बकुळफुलांनी गुंफिली वेणी
कर्णभूषणे झुलती कानी
रुणुझुणु गाती कंकण हाती
गुपित सांगती जना
आली सखी आली, प्रियामीलना !
गीत | - | वसंत अवसरे |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे |
चित्रपट | - | अवघाचि संसार |
राग | - | भैरवी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अधर | - | ओठ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.