A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आली बाई पंचिम रंगाची

संक्रांतीला भेटू ऐसी केली होती बोली
पुनव फाल्गुनी होऊन गेली, तेव्हा स्वारी आली
अशा या वायदेभंगाची, आली बाई पंचिम रंगाची

आला तैसे जा परतून
फिरा नगरच्या पेठेतून
राया मजला चोळी आणा, आणा भिंगाची
आली बाई पंचिम रंगाची

लेईन चोळी, सजेन खूप
उरी-जिव्हारी तुमचे रूप
शमेल लाही अंगाची, ग बाई अंगाची
आली बाई पंचिम रंगाची

शालू आणा सफेदफेक
सर मोत्याचा सुंदर एक
नथणी न्यार्‍या ढंगाची, ग बाई ढंगाची
आली बाई पंचिम रंगाची

फाल्गुनातली राजस रात
भिजुनी जाईल प्रीतरसात
जोडी कमळण-भृंगाची, ग बाई दोघांची
आली बाई पंचिम रंगाची