A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आळविते मी तुला विठ्ठला

आळविते मी तुला, विठ्ठला
देहमनाला व्यापुनि उरला तव चरणांचा लळा

रोज पहाटे नयनांपुढती
तुझी प्रगटते श्यामल मूर्ती
मनभावांच्या निर्मळ ज्योती घेते आरतीला

उपासनेची उटी लाविते
शुभनामांची माळ गुंफिते
निर्मोहाचा रेखुन घेते तिलक तुझ्या भाळा

प्रेमघना रे, कधि तू येशिल?
मम जीवन-वन फुलवुन जाशिल
रात्रंदिन मी हा मधुमंगल ध्यास मनी धरिला