आला वसंत देही
आला वसंत देही मज ठाउकेच नाही
भीतीविना कशाचा देहावरी शहारा?
हे ऊन भूषवीते सोन्यापरी शरीरा
का गुंफिली जरीने आभाळीची निळाई
ओठांत थांबते का हासू उगाच माझे?
बाहेर डोकवीता का बोल आज लाजे?
तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई
हे आज काय झाले? माझे मला कळेना
या नेणत्या जिवाला हे गुज आकळेना
ये गंध मोगर्याचा, आली फुलून जाई
भीतीविना कशाचा देहावरी शहारा?
हे ऊन भूषवीते सोन्यापरी शरीरा
का गुंफिली जरीने आभाळीची निळाई
ओठांत थांबते का हासू उगाच माझे?
बाहेर डोकवीता का बोल आज लाजे?
तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई
हे आज काय झाले? माझे मला कळेना
या नेणत्या जिवाला हे गुज आकळेना
ये गंध मोगर्याचा, आली फुलून जाई
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | प्रपंच |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
आकळणे | - | आकलन होणे, समजणे. |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
नेणता | - | अजाण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.