आज प्रीतीला पंख हे
आज प्रीतीला पंख हे लाभले रे
झेप घेउनी पाखरू चालले रे
उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्न सुखाचे
तुझी होउनी आज मी राहिले रे
असा लाजरा-बावरा प्रणय असावा
तुझी सावली त्यात मी घेत विसावा
असे आगळे चित्र मी पाहिले रे
दोन जिवांनी एक असावे
मस्त होउनी धुंद फिरावे
पंचप्राण हे पायी मी वाहिले रे
झेप घेउनी पाखरू चालले रे
उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्न सुखाचे
तुझी होउनी आज मी राहिले रे
असा लाजरा-बावरा प्रणय असावा
तुझी सावली त्यात मी घेत विसावा
असे आगळे चित्र मी पाहिले रे
दोन जिवांनी एक असावे
मस्त होउनी धुंद फिरावे
पंचप्राण हे पायी मी वाहिले रे
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके |
चित्रपट | - | कुंकवाचा करंडा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.