आज मी शापमुक्त जाहलें
रामा, चरण तुझे लागले
आज मी शापमुक्त जाहलें
तुझ्या कृपेची शिल्प-सत्कृति
माझी मज ये पुन्हां आकृति
मुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाउलें
पुन्हां लोचनां लाभे दृष्टि
दिसशी मज तूं, तुझ्यांत सृष्टि
गोठगोठले अश्रू तापुन गालांवर वाहिले
श्रवणांना ये पुनरपि शक्ति
मनां उमगली अमोल उक्ति
"ऊठ अहल्ये"- असें कुणीसें करुणावच बोललें
पुलकित झालें शरीर ओणवें
तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे
चरणधुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागलें
मौनालागी स्फुरलें भाषण
श्रीरामा, तूं पतितपावन
तुझ्या दयेनें आज हलाहल अमृतांत नाहलें
पतितपावना श्रीरघुराजा !
काय बांधुं मी तुमची पूजा
पुनर्जात हें जीवन अवघें पायांवर वाहिले
आज मी शापमुक्त जाहलें
तुझ्या कृपेची शिल्प-सत्कृति
माझी मज ये पुन्हां आकृति
मुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाउलें
पुन्हां लोचनां लाभे दृष्टि
दिसशी मज तूं, तुझ्यांत सृष्टि
गोठगोठले अश्रू तापुन गालांवर वाहिले
श्रवणांना ये पुनरपि शक्ति
मनां उमगली अमोल उक्ति
"ऊठ अहल्ये"- असें कुणीसें करुणावच बोललें
पुलकित झालें शरीर ओणवें
तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे
चरणधुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागलें
मौनालागी स्फुरलें भाषण
श्रीरामा, तूं पतितपावन
तुझ्या दयेनें आज हलाहल अमृतांत नाहलें
पतितपावना श्रीरघुराजा !
काय बांधुं मी तुमची पूजा
पुनर्जात हें जीवन अवघें पायांवर वाहिले
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वराविष्कार | - | ∙ सुधीर फडके ∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
राग | - | स्वतंत्र रचना |
गीत प्रकार | - | गीतरामायण, राम निरंजन |
टीप - • गीतरामायण. | ||
• प्रथम प्रसारण दिनांक- १०/६/१९५५ | ||
• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- मालती पांडे. |
अहल्या | - | ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला. |
उक्ती | - | बोलणे, भाषण, वाक्य. |
ओणवा | - | पुढे वाकलेला. |
पुनर्जात | - | पुनर्जनित, पुन्हा उत्पन्न झालेले / केलेले. |
पुलकित | - | आनंदित. |
सत्कृति | - | चांसले काम / पुण्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.