A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज अचानक गाठ पडे

आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळीं भलत्या मेळीं
असतां मन भलतीचकडे

नयन वळवितां सहज कुठे तरी
एकाएकी तूंच पुढे

दचकुनि जागत जीव नीजेंतच
क्षणभर अंतरपट उघडे

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागे मुरडे

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे
गीत - कवी अनिल
संगीत - पं. कुमार गंधर्व
स्वर- पं. कुमार गंधर्व
राग - भीमपलास
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- ३० जुलै १९५२, वर्धा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.