वाळवंटांतून भीषण
वाळवंटांतून, भीषण वैराण
चालले जीवन, चालले जीवन
वाळूचा सागर, क्षितिजे चौफेर
त्यावर लोळते, जळते, अंबर
रेतीस नाचवी वाफेचे तुफान
गेले रे गेले रे संगती-सोबती
पुसट पाऊले ठेवून मागुती
कितीक जायाचे असेच अजून
कलला कलला दिवस कलला
उंटांच्या पायांनी काळ हा चालला
लांबल्या सावल्या चालल्या सोडून
चालले जीवन, चालले जीवन
वाळूचा सागर, क्षितिजे चौफेर
त्यावर लोळते, जळते, अंबर
रेतीस नाचवी वाफेचे तुफान
गेले रे गेले रे संगती-सोबती
पुसट पाऊले ठेवून मागुती
कितीक जायाचे असेच अजून
कलला कलला दिवस कलला
उंटांच्या पायांनी काळ हा चालला
लांबल्या सावल्या चालल्या सोडून
| गीत | - | शंकर वैद्य |
| संगीत | - | यशवंत देव |
| स्वर | - | अरुण दाते |



















