सत्यात नाहि आले
सत्यात नाहि आले, स्वप्नात येउ का ?
विसरायचे तरीही स्मरणात साठलेले
ते रूप प्रेमवेडे पाहून जाउ का ?
हृदयात रंगलेले, लाजेत गुंतलेले
ओठांवरी उभे ते गाऊन जाऊ का ?
हसता नभात तारा, हसता फुलात वारा
प्राणांत हासते ते उधळून जाऊ का ?
तूझी म्हणून घ्यावे, स्वप्नीच हे घडावे
ही आस सानुलीशी पुरवून घेउ का ?
विसरायचे तरीही स्मरणात साठलेले
ते रूप प्रेमवेडे पाहून जाउ का ?
हृदयात रंगलेले, लाजेत गुंतलेले
ओठांवरी उभे ते गाऊन जाऊ का ?
हसता नभात तारा, हसता फुलात वारा
प्राणांत हासते ते उधळून जाऊ का ?
तूझी म्हणून घ्यावे, स्वप्नीच हे घडावे
ही आस सानुलीशी पुरवून घेउ का ?
| गीत | - | संजीवनी मराठे |
| संगीत | - | प्रभाकर जोग |
| स्वर | - | मंदाकिनी पांडे |



















