नांदायला नांदायला
नांदायला नांदायला नांदायला, मला बाई जायाचं नांदायला

पत्‍तुर आलं रायाचं, लिवलंय मोठं गमतीचं
लाज मला वाटते सांगायला, मला बाई जायाचं नांदायला

घुंगराची गाडी येईल ग, बसून त्यामधी जाईल ग
आडाचं पानी शेंदायला, मला बाई जायाचं नांदायला

नाजूक माझी काया ग, जवळ घेतील राया ग
पिरतीचं गठुडं बांधायला, मला बाई जायाचं नांदायला
गीत -
संगीत - विठ्ठल शिंदे
स्वर - रोशन सातारकर