A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गळ्यात माझ्या तूच जिवलगा

गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले
जन्मोजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले

दिसायला मी काळीसावळी, मुलखाची लाजरी
नटणे-सजणे या भोळीला ठाऊक नसता परि
तव नयनांचा पाऊस अवचित पडला अंगावरी
वठल्या देही चैत्रपालवी, कणकण मोहरले

प्रीतीची तव खातर होऊन तुझ्याकडे धावले
जनरूढीच्या लोहशृंखला झाली जड पाऊले
कुचाळकीची आग पसरुनी उठता ही वादळे
हात देउनी तूच राजसा, फुलापरी झेलले

पाचूचा हा चुडा भरूनिया तुजभवती नाचले
आनंदाचे अश्रू उधळित सप्तपदी चालले
तूच दयाळा सौभाग्याचे लेणे मज अर्पिले
अभागिनीच्या कुंकू कपाळी सख्या तूवा लाविले
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभु
स्वर- आशा भोसले
गीत प्रकार - भावगीत
कुचाळी - निंदा / कुचेष्टा.
लेणे - वस्‍त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.