अरे कोंडला कोंडला देव
अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला
बारे सांडला सांडला भाव भक्‍तीचा सांडला

भक्‍तांसाठी केला उभा हा संसार, भांडाराचे दार तुझ्या हाती
नरा दिले कर, करणी देवाची, माया जोडण्याची भक्‍ती ठेवी

उजेड-अंधार देवाचं हे रूप, त्याचे मनी पाप ठेवू नये
कोंडलं हे पाणी, वाट द्या मोकळी, विश्वाचा तू माळी होई भक्‍ता

गरिब-श्रीमंत, त्याची तुला खंत, गरिबाचा संत भक्‍त तोची
सेवाधर्म सारा करावा मुकाट, मागे कटकट ठेवू नये
गीत - शरद निफाडकर
संगीत - राम-लक्ष्मण
स्वर - चंद्रशेखर गाडगीळ
चित्रपट-नवरे सगळे गाढव (१९८२)