A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पहिले भांडण केले कोणी

पहिले भांडण केले कोणी?
सांग रे राजा, कशी रुसून गेली राणी

अडखळला का पाय जरा?
वळता, गळला का गजरा?
लटका होता राग मुखावर, डोळ्यांत लटके पाणी

मान वेळता खेळ कळे
दंवात फुलले दोन कळे
थरथरणारे ओठ जहाले क्षणांत हसल्यावाणी

कलह प्रीतीचा गोडीचा
विलास जमल्या जोडीचा
विरह नकोसा तरीही सुंदर, जीव गुंतता दोन्ही !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- मालती पांडे
चित्रपट - लाखाची गोष्ट
गीत प्रकार - चित्रगीत
कळा - मोठी कळी.
वेळावणे (वेळणे) - सैल सोडून हलविणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.