A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मोहरला मधुमास

मोहरला मधुमास, मानसी
घडता नित्य तुझा सहवास

सहवासाची दीपज्योत ही
अंतर आपुले उजळीत राही
परिमल येई प्राजक्ताचा हळव्या प्राणफुलास

तव स्पर्शाने गुलमोहर तो
अंगाअंगातुन बहरून येतो
नयनांमधली निळी मोहिनी करिते नित्य विलास

नसता कोणी हिरव्या रानी
गंधवतीला जवळ घेउनी
माझ्या भवती टाक मुलायम मृदुल करांचा पाश

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.