A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हसतेस अशी कां मनी

हसतेस अशी कां मनीं
कोण ग उभे तुझ्या अंगणीं !

कितिकदां वळुन पाहसी
अन्‌ पुन्हां नजर वळविसी
हा लपंडाव खेळसी
कोण ग उभे तुझ्या अंगणीं !

अडविसी मुखावर हसे
थरकांप हृदयिं होतसे
लागलें कुणाचें पिसे
कोण ग उभे तुझ्या अंगणीं !

वळते न जीभ का मुकी?
रक्तिमा पसरते मुखीं
रेखिलें चित्र हें कुणी
कोण ग उभे तुझ्या अंगणीं !

कोण ग ! तेच का गडे?
पण कशास हो एवढे
अगबाई, मुळीं न आवडे
नव्हे का नांवहि तें भाषणीं
कोण ग उभे तुझ्या अंगणीं !
पिसे - वेड.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.