जीवाशिवाची
बैलजोड, लावल
पैजेला आपली
कुड,
लावल पैजेला
आपली कुड, नी
जिवाभावाचं
लिंबलोण
नीट चालदे माझी
गाडी, दिन रातीच्या
चाकोरीन,
दिन रातीच्या
चाकोरीन, जाया
निघाली पैलथडी
रं !
डौल मोराच्या
मानचा रं डौल
मानचा
येग रामाच्या
बानाचा रं येग
बानाचा
तान्या-सर्जा
तुह नाम जोडी
कुना हुवीत
हाती घोडी माझ्या
राजा रं
धरती आभाळाची
चाकं, त्याच्या
धुनवेची हो
गाडी
सुर्व्या-चंदराची
हो जोडी, त्याच्या
सर्गाची रं
माडी माझ्या
राजा रं
सटी (सती) शंकराची
माया, इस्नू
लक्षुमीचा राया
पुरुस परकरतीची
जोडी, डाव परपंचाचा
मांडी माझ्या
राजा रं |