रेशमाच्या रेघांनी,
लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा
मी काढीला
हात नगा लावू
माझ्या साडीला
!
नवी कोरी साडी
लाखमोलाची
भरली मी नक्षी
फूलवेलाची
गुंफियले राघूमोर
राघूमोर जोडीला
हात नगा लावू
माझ्या साडीला
!
जात होते वाटेनं
मी तो-यात
अवचित आला माझ्या
हो-यात
तुम्ही माझ्या
पदराचा शेव
का हो ओढीला
?
हात नगा लावू
माझ्या साडीला
!
भीड काही ठेवा
आल्यागेल्याची
मुरवत राखा
दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई
बाई, तुमच्या
या खोडीला
हात नगा लावू
माझ्या साडीला
!
|