मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते
उमलण्या आधीच कैसे, फूल पायी तुडविते !

खेळ नियती खेळते की, पाप येते हे फळा
वाहणा-या या जळाला कोण मार्गी अडविते ?

ईश्वरेच्छा हीच किंवा, संचिताचा शाप हा
चंद्ररेखा प्रतिपदेची कोण तिमिरी बुडविते ?
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - आनंदघन
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - तांबडी माती (१९६९)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.