पाहुणा म्हणूनी
आला, जरा घरात
थारा दिला
दांडगाई करुनी
ग बाई चार दिसात
घरधनी झाला
भोळीस भासला
भोळा
साधाच आणि मनमोकळा
परि अंगात नाना
कळा
डोळ्यास लावता
डोळा, मज पुरता
कावा कळला
पचताच पहिली
ही खोडी
करी खुशाल लाडीगोडी
हृदयाचे कुलुपही
तोडी
भर दिवसा करी
घरफोडी, चोरटा
घरामधी घुसला
|