शपथ दुधाची
या आईच्या;
फिर माघारी
पोरी
तुझे भुकेने
व्याकुळलेले
बघुनी ग डोळे
उरी मायेच्या
काळजाचे पाणी
पाणी झाले
चार घास हे
तुला भरविते
माझ्या ओठावरले
डोळ्यामधील
पाजिल पाणी
गंगा राजापुरी
जन्मलीस तू
अभिमानाच्या
थोर मराठ्याकुळी
प्राण देउनी
आजवर ज्यांनी
अब्रू ही ग
जपली
हरिश्चंद्रापरि
सत्यकसोटी असेल
ग अपुली
दुरुनी बाळे
दैव पहाते गरिबी
आणून घरी
|