सांग सांग सांग
सांग
काय रं ?
तुजं नाव, तुजं
गाव, तुजं नाव,
तुंज गाव
नाव सांग सांग
सांग गाव सांग
!
चाललीस तुरुतुरु,
अढि नगं मनी
धरू
नाव सांग सांग
सांग गाव सांग
!
जा रं !
गोडवानी नगं
हसू, नाव गाव
नगं पुसू
थांब थांब थांब
जरा थांब !
व्हट उगडुन
सखू माज्यासंगं
तू बोल
शब्दाशब्दाला
घे मोत्यापवळ्याचं
मोल
तुज्या मागं
मागं आलो, तुज्यापायी
येडा जालो
नाव सांग सांग
सांग गाव सांग
!
नार नवेली मी
रूप लाखात एक
जाते जपून जपून
तालेवाराची
लेक
तुज्या डोळियाचं
बान, झाला कासावीस
परान
नाव गाव नगं
पुसू थांब थांब
थांब !
|