| रेशमाच्या रेघांनी,
लालकाळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला हात नगा लावू माझ्या साडीला ! नवी कोरी साडी लाखमोलाची भरली मी नक्षी फूलवेलाची गुंफियले राघूमोर राघूमोर जोडीला हात नगा लावू माझ्या साडीला ! जात होते वाटेनं मी तो-यात अवचित आला माझ्या हो-यात तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला ? हात नगा लावू माझ्या साडीला ! भीड काही ठेवा आल्यागेल्याची मुरवत राखा दहा डोळ्यांची काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला हात नगा लावू माझ्या साडीला ! |
||||
| गीत | - | शांता शेळके | ||
| संगीत | - | आनंदघन | ||
| स्वर | - | आशा भोसले | ||
| चित्रपट | - | मराठा तितुका मेळवावा (१९६४) | ||
|
||||